कुडाळ शहरासह तालुक्यात “जनता कर्फ्यू”

कुडाळ शहरासह तालुक्यात “जनता कर्फ्यू”

 

कुडाळ :

कोरोनावर मात करण्यासाठी कुडाळ तालुक्यात ७ ते १५ मे या काळात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी या काळात रस्त्यावर येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस व तहसीलदार प्रशासनाकडून यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा