अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचे निधन

अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचे निधन

अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचे कार्डिअॅक अरेस्टने बुधवारी पहाटे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. राज यांची प्रकृती एक दिवस आधीच ढासळली असल्याचं त्यांचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंटने सांगितलं.  राज यांनी हृदयविकाराचा झटका येत असल्याचं मंदिराला सांगितलं होतं, असं ही ते म्हणाले. पण त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत उशीर झाला होता.

सुलेमान म्हणाले, “मंगळवारी संध्याकाळपासूनच राज यांना बरं वाटत नव्हतं. त्यांनी काही अँटासिड टॅबलेट घेतल्या पण दुसऱ्या दिवशी पहाटेच चार वाजताच्या सुमारास त्यांनी मंदिराला सांगितले की, हृदयविकाराचा झटका येतोय. त्यानंतर मंदिराने मित्र आशिष चौधरीला बोलावून राज यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. पण तितक्यात राज बेशुद्ध झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.”

प्रतिक्रिया व्यक्त करा