‘मधू दुकान’ झालं पोरकं

‘मधू दुकान’ झालं पोरकं

कळसुलीतील सुप्रसिद्ध ‘मधु’ दुकानाचे मालक मधुकर सखाराम पुजारे काळाच्या पडद्याआड

कणकवली

‘कळसुली’ म्हटलं की काही ‘स्पेशल’ ठिकाणांमध्ये ‘मधु दुकान’ हे नाव प्राधान्याने घेतलं जातं. गावातील अनेकांचं हे विसाव्याचं ठिकाण. पंचक्रोशीत आपल्या अनोख्या चवीमुळे आणि माणसं जोडण्याच्या वेगळ्या हुन्नरीमुळे इथे खवय्यांची रांगच रांग लागलेली असते. रात्रीची वस्तीसाठी थांबणारी एस. टी. ची गाडी इथेच विसाव्याला थांबते. त्या हरएक ड्रायव्हर, कंडक्टरसाठी ‘मधुचं दुकान’ त्यांचं दुसरं घरच झालंय. पंचक्रोशीतील लोक आणि मुंबईहून आलेला प्रत्येक चाकरमानी येथे शेव, चिवडा, लाडू, भजी घेण्यासाठी आणि मुंबईला फराळ म्हणून घेऊन जाण्यासाठी हमखास येतो. ही चव निर्माण करण्यामागे हात होता तो या दुकानाचे मालक मधुकर पुजारे यांचा. त्यांच्या नावामुळेच हे हॉटेल ‘मधु दुकान’ म्हणून पंचक्रोशीत सुप्रसिद्ध झालं. परंतु या अन्नपुर्णेचा आशीर्वाद मिळालेल्या दिलदार माणसाचा आज सकाळी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कळसुली गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा