You are currently viewing तुझा मुडदा पाडतो अशी धमकी देत कोयत्याने वार करून पाच जणांना जखमी केले

तुझा मुडदा पाडतो अशी धमकी देत कोयत्याने वार करून पाच जणांना जखमी केले

बहिणीला पळून नेणाऱ्याला मदत केल्याच्या संशयावरून टोळक्याने एका तरूणासह त्याच्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बोपोडीतील साई मंदिराजवळ घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.

आकाश उत्तम गायकवाड (20), सिद्धांत योगेश चव्हाण (19), रोहित उर्फ बिट्या फ्रान्सिस अमोलीक (30), पापू उर्फ जोसेफ आरकेदास मोती (30), शुभम बाळू सावंत (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शेखर गायकवाड (29) यांनी फिर्याद दिली आहे.

बोपोडीतील आकाश गायकवाड यांच्या बहिणीला प्रशांत जाधवने पळवून नेले होते. त्याला मदत केल्याच्या संशयावरून काल रात्री बाराच्या सुमारास टोळक्याने शेखरला घराजवळ अडविले.

तुझा मुडदा पाडतो अशी धमकी देत कोयत्याने वार करून जखमी केले.

 

त्यानंतर शेखरचे आई-वडिलांनी मध्यस्थी केली असता, आरोपींना त्यांना दांडक्याने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 3 =