वैभववाडी पं.स. तर्फे आज कृषी दिन कार्यक्रम

वैभववाडी पं.स. तर्फे आज कृषी दिन कार्यक्रम

 

वैभववाडी पंचायत समिती वैभववाडी यांच्या वतीने १ जुलै रोजी ग्रामपंचायत सोनाळी येथे कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंदराव रावराणे, पंचायत समिती सदस्य शारदा कांबळे, पल्लवी झीमाळ, सुधीर नकाशे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, कृषी अधिकारी शशिकांत भरसट आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच श्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक बांबू लागवड शुभारंभ आदी उपक्रम करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा