You are currently viewing वि.ग.सातपुते यांच्या ” संस्कार शिदोरी ” या पुस्तकाचे अभिवाचन

वि.ग.सातपुते यांच्या ” संस्कार शिदोरी ” या पुस्तकाचे अभिवाचन

सातारा:(प्रतिनिधी)

सातारा येथे हिंदवी रेडिओ सातारा या आकाशवाणी केंद्रावर पुण्यातील महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी व व्याख्याते वि.ग. सातपुते यांच्या “*संस्कार शिदोरी*” या प्रसिद्ध मौलिक पुस्तकाच्या 121 भागांची मालिका संपन्न झाली. या संपूर्ण 121 भागांचे अभिवाचक श्री.शेखर कुलकर्णी हे होते.

अभिवचन करणाऱ्या अभिवाचक श्री.शेखर कुलकर्णी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सर्वश्री अभिषेक पेंडसे, जितेंद्र बाबर, धैर्यशील दादा ( कोल्हापूर) व ॲड.योगेंद्र सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होत आहे. भारतीय संस्कारांच्या संस्कृती प्रधान विचारांच्या या अभिवाचनाला श्रोत्यांच्या कडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 1 =