You are currently viewing जिल्हा शल्यचिकित्सकासह रिक्त पदे तातडीने भरा: कृती समितीचे आत्मक्लेश आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच!

जिल्हा शल्यचिकित्सकासह रिक्त पदे तातडीने भरा: कृती समितीचे आत्मक्लेश आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच!

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली असून जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोराणाची साथ आणि त्यातील मृत्यूचे तांडव हे विदारक चित्र या जिल्ह्यांतील नागरिकांसमोर उभे आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सतर्क पोलिस टाईम्स व आरोग्य हक्क समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सिंधुनगरी येथील जिल्हाधिकारी भवनासमोर बेमुदत आत्मक्लेश आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. रिक्त पदे भरण्याचा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीतील असल्याने या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी याबाबतचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान प्र. जिल्हा डॉ श्रीपाद पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रिक्त पदांचा प्रश्न शासनस्तरावर पाठविल्याचे व शासनाकडून भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे उपोषण करताना सांगितले. व आपण हे उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केले आहे. मात्र जोपर्यंत येथील रिक्त पदे भरण्याबाबत चे आदेश होत नाही ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 8 =