You are currently viewing कणकवलीत उद्या आ. भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार

कणकवलीत उद्या आ. भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवार दि. १४ जुलै रोजी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून कणकवलीत त्यांची तोफ धडाडणार आहे. आ. भास्कर जाधव यांचे सकाळी १०:३० वाजता कणकवली विजय भवन येथे स्वागत केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१:३० ते ०२:०० वा. पर्यंत कणकवली विजय भवन येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. तर सायंकाळी ०४ वाजता विजय भवन येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत.

संदेश पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा