You are currently viewing वेंगुर्ला कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

वेंगुर्ला कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

वेंगुर्ले

वेंगुर्ला कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा भक्ती पूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळी पुरोहिता करवी श्री स्वामी समर्थांची पूजा केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर श्री स्वामी समर्थांची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व तदनंतर महाआरती व महा नैवेद्य असा धार्मिक सोहळा संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यास जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून हजारो भाविकानी उपस्थिती राहून दर्शनाचा लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा