You are currently viewing तिराळी नदीवर मणेरी येथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी –  पं. समिती सदस्य सौ.धनश्री गवस

तिराळी नदीवर मणेरी येथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी – पं. समिती सदस्य सौ.धनश्री गवस

संरक्षक भिंत बांधकामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यास आदेश देण्यात यावेत सौ.धनश्री गवस यांनी केली पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली लेखी मागणी..

दोडामार्ग

महाराष्ट्र शासनाने तिराळी नदीचे पाणी वेंगुर्ल्यापर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र प्राधिकरण सुमारे २०० कोटीची योजना राबवीत आहे. त्यासाठी मणेरी येथे नदीवर मोठा बंधारा बांधून टे अडवलेले पाणी पाईप लाईन द्वारे सावंतवाडी व वेंगुर्ला येथे द्यावयाचे आहे. सदर बंधा-यामुळे  पावसाळ्यात बंधाऱ्याला अनेक झाडे, गाळ अडकल्यामुळे तसेच तिराळी धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे ते सर्व पाणी मणेरी बडमेवाडी येथील ग्रामस्थांच्या शेती बागायती व घराघरांमध्ये घुसते. दरवर्षी येथे पूरपरिस्थिती निर्माण होते.

गेल्या २ वर्षामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत दिलेली नाही. भविष्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या या संकटावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर बंधार्यापासून मणेरी पुलापर्यंत दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत उभारण्याचे आदेश आपल्या स्तरावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास द्यावेत अशी पंचायत समिती सदस्य सौ.धनश्री गवस यांनी केली पालकमंत्री मा.ना.उदयजी सामंत यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 15 =