वेंगुर्ला येथे कोविड सेंटर च्या उद्घाटनला पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहू शकतात, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात एका महिला प्रतिनिधी सह चार उपोषणकर्त्यांची साधी भेट घेण्याची त्या सर्वांची मानसिकता नसल्याची खंत ; राजन रेडकर

वेंगुर्ला येथे कोविड सेंटर च्या उद्घाटनला पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहू शकतात, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात एका महिला प्रतिनिधी सह चार उपोषणकर्त्यांची साधी भेट घेण्याची त्या सर्वांची मानसिकता नसल्याची खंत ; राजन रेडकर

पालकमंत्री व जिल्हाधिकारी ह्यानी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवून देखील सुरू असलेल्या बेमुदत आत्मक्लेश उपोषणाची अद्याप पर्यंत दखल न घेतल्यास आमरण उपोषण सुरूच राहील ; भूषण मांजरेकर

भर पावसात जिव्हाळ्याच्या बेमुदत उपोषणाला बसणार्‍या महिलेस पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित करून न्याय न देणे ही त्यांची सपशेल हारच ; रिमा मेस्त्री

कुडाळ

सतर्क पोलीस टाइम्सचे सल्लागार संपादक आणि भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था यांचे काल पासून ओरोस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आत्मक्लेश उपोषण सुरु आहे .

जिल्हा वासियांच्या आरोग्याची काळजी करत व स्वतः पावसात भिजून बेमुदत आत्मक्लेश उपोषण करण्याऱ्या या पाच व्यक्तिंची पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपोषण स्थळी भेट देण्याची मानसिकता नसल्याने खंत व्यक्त होत आहे. असे उद्गार उपोषण कर्ते सतर्क पोलिस टाईम्सचे सल्लागार संपादक राजन रेडकर यांनी काढले.

पालकमंत्री व जिल्हाधिकारी ह्यानी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवली मात्र त्यांनी या आत्मक्लेश उपोषणाची अद्याप पर्यंत दखल घेतली नाही. या आत्मक्लेश उपोषणाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण सुरूच राहील असे उपोषण कर्ते भूषण मांजरेकर यांनी सांगितले आहे.

भर पावसात जिव्हाळ्याच्या बेमुदत उपोषणाला बसणार्‍या महिलेस पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित करून न्याय न देणे ही त्यांची सपशेल हारच अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ति महिला रिमा मेस्त्री यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा