You are currently viewing निरवडेत अपघातानंतर तणावाचे वातावरण; पोलीस सुशेगाद..

निरवडेत अपघातानंतर तणावाचे वातावरण; पोलीस सुशेगाद..

सावंतवाडी :

सावंतवाडी शिरोडा मार्गावर निरवडे येथे दोन दुचाकी मध्ये अपघात झाला. दुचाकी चालक विरुद्ध दिशेने अचानक आल्याने एव्हिएटर (Aviator) गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात एव्हिएटर (Aviator) दुचाकी चालक बचावला. मात्र त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान घटनास्थळी न्हावेली ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. नुकसान भरपाई मिळाल्यानंतरच दुचाकी हलविण्याची भूमिका न्हावेली ग्रामस्थांनी घेतली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निरवडेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 4 =