ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिक लसीकरणापासून वंचित… नोंदणी ऑफलाईन करा; स्थानिकांना प्राधान्य द्या…

ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिक लसीकरणापासून वंचित… नोंदणी ऑफलाईन करा; स्थानिकांना प्राधान्य द्या…

बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी

बांदा

शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून नेटवर्क प्रॉब्लेम वारंवार होत असल्याने स्थानिक लसीकरणापासून वंचित राहत आहे.त्यामुळे फार मोठ्या रोष निर्माण झाला असून यावर त्वरित लक्ष देऊन हे लसीकरण ऑफलाईन करावे.जो प्रथम येईल त्याला प्राधान्य देत स्थानिकांना न्याय देण्याची मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी जिल्हाधिकारी,जि. प .अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आहे.बांदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध होतात.मात्र याबाबत रजिस्ट्रेशन रात्रौ करावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो.परिणामी बांदा येथील स्थानिक नागरिक नोंदणी झाली नसल्याने त्यांना लस घेता येत नाही.तर लस बांद्यात मात्र फायदा इतर ठिकाणच्या लोकांना होत असल्याने तीव्र नाराजी स्थानकातून होत आहे.त्यामुळे हे लसीकरण ऑफलाईन करावे व जो उपस्थित असेल त्याला लस द्यावी अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जि. प.अध्यक्ष संजना सावंत,जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.पाटील,आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांच्याकडे केली असून सिंधुदुर्गनगरी येथे भेट घेऊन वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणार असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले. .

प्रतिक्रिया व्यक्त करा