You are currently viewing आगामी ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढणार….

आगामी ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढणार….

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेमध्ये घेतला निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची सभा जिल्हा कार्यालय ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सदर सभेमध्ये विभागीय अध्यक्ष व उपविभागीय अध्यक्ष नेमणे, ग्राम कमिटी अध्यक्ष नेमणे तसेच येणा-या ग्रामपंचायत निवडणुका स्वबळार लढवण्याचे ठरविण्यात आले. या सभेला माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, साईनाथ चव्हाण, इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, दादा परब, नागेश मोर्ये, विजय प्रभू, चंद्रशेखर जोशी, महेंद्र सावंत, सुगंधा साटम, निता राणे, कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज, देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, महेश अंधारी, रविंद्र म्हापसेकर, कृष्णा धाऊसकर, हरीश्चंद्र टेंबूलकर, खलिल बगदादी, सुभाष दळवी, शंकर वस्त, सुमेधा सावंत, आनंद परूळेकर, संदेश कोयंडे, सुरेश देवगडकर, विद्याप्रसाद बांदेकर, अमिदी मेस्त्री, श्रीधर खेडेकर, माया चिटणीस, अरविंद मोंडकर, प्रकाश डिचोलकर, जेम्स फर्नांडिस, विभावरी सुकी, नंदकिशोर कांदळगावकर,महेश परब, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, NSUI अध्यक्ष कौस्तुभ गावडे, ओबीसी सेल अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सरफराज नाईक, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सुनिल निरवडेकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, सिद्धेश परब, मिडिया सेल जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + twelve =