You are currently viewing विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचा उद्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळा

विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचा उद्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळा

विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचा उद्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळा

विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

ओटवणे

विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळा नं ३ च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गुरूवारी ११ जानेवारीला विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखन राजे भोसले यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे देवस्थान प्रमुख बाबुराव दळवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, माजी सरपंच मोहन दळवी, विलवडे पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, माजी केंद्रप्रमुख संदीप गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती व तिर्थ प्रसाद, सायंकाळी भजन, रात्री ८ वाजता रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह या शाळेत सेवा बजावलेल्या माजी शिक्षकांचा तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा (सिंधुदुर्ग) ‘छिन्नमस्ता’ हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रौप्य महोत्सव समिती अध्यक्ष एकनाथ दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उत्कर्षा दळवी, पालक शिक्षक व माता पालक संघ तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली मिशाळ आणि विलवडे वरचीवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा