You are currently viewing धडाकेबाज नेतृत्व

धडाकेबाज नेतृत्व

आमदार नितेश राणे हे नाव जरी ऐकलं तरी आठवण येते ती नारायण राणे यांच्या धडाकेबाज कामाची, हुशारीची आणि दिल्या वचनाला जागण्याच्या त्यांच्या वृत्तीची. “जे बोलणार ते करून दाखवणारच” अशीच वृत्ती आहे युवा कार्यसम्राटआमदार नितेश राणे यांची. गोरगरिबांच्या मदतीला धावणारा, दयाळू, निर्णयक्षमता असलेला, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून समस्या तडीस नेणारा असा हा युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत असलेला हक्काचा माणूस म्हणजे नितेश राणे. अल्पावधीतच सिंधुदुर्गासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याच्या जोरावर नितेश राणे लोकप्रिय झाले. काम कोणतंही असू दे त्यांची झोकून देऊन काम करण्याची पद्धतच यश देऊन जाते. माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली की माणूस सहज यशाला गवसणी घालू शकतो. अगदी तशीच प्रबळ इच्छाशक्ती नितेश राणे यांची आहे.
नितेश राणे यांच्यामध्ये नारायण राणे यांचीच झलक दिसते. तरुणपणीचे नारायण राणे आणि त्यांचा कामाचा धडाका किंबहुना थोडा जास्तच नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येतो. वैभववाडी, देवगड सारख्या जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेल्या तालुक्यात आज नितेश राणे यांनी आमदार झाल्यावर आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. देवगड मध्ये स्कुबा डायव्हिंग, वॅक्स म्युझियम, कंटेनर थिएटर, वैभववाडीतील महाराणा प्रताप कलादालन, देवगड येथील सुंदर गार्डन सारखे उपक्रम राबवून जिल्हा खरोखरच पर्यटन जिल्हा असल्याचं दाखवून दिले आहे. शिक्षण, क्रीडा, पर्यटन, रोजगार या क्षेत्रात नितेश राणे यांचे काम उल्लेखनीय आहे, कोणालाही हेवा वाटावा असंच त्यांचं काम असतं.
कणकवलीत बोलल्या प्रमाणे पोद्दारचे इंग्रजी माध्यमाचे स्कुल, मतदारसंघात १५० शाळा डिजिटल करून शिक्षण क्षेत्रात न भूतो न भविष्यती काम केलं आहे. नितेश राणे जे बोलणार ते तडीस नेणारच. मच्छीमारांची समस्या सोडविण्यासाठी समुद्र किनाऱ्यापासून मंत्रालयापर्यंत ते धाव घेतात. मुलांचे शालेय दाखल्याचे प्रश्न असो वा रस्ते, वीज, पाणी प्रश्न असो ते सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहणारा हा हक्काचा माणूस सिंधुदुर्गापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. पाणी समस्या असलेल्या गावात सरकारी मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून त्यांनी बोअरवेल खोदून दिलेल्या आहेत. गणपतीत चाकरमान्यांसाठी १०० रुपयात गावी आणणे असो वा वृद्धांना पंढरपूर वगैरे तिर्थक्षेत्रांच्या भेटी असो नितेश राणे दरवर्षी असे उपक्रम राबवित असतात.
शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा मराठा समाजाचे आंदोलन, नितेश राणे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. कोकणातील महामार्गाचे काम असो वा लोकांची नुकसानभरपाई, ते नेहमीच लोकांच्या बाजूने उभे राहत त्यांचे प्रश्न सोडवतात. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून काम सुरू करून लोकांच्या समस्या सोडविल्या, महाराष्ट्राच्या प्रतिभावान धडाकेबाज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा युवा नेता आपल्या कामांच्या जोरावर घराघरात पोचला आहे. अंगावर आलेल्याना शिंगावर घेण्याची धमक त्यांच्यात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील सरपंचांवर कोविड कक्ष गावागावात उभारण्याची जबाबदारी सोपवली तेव्हा सरपंचांना सर्वप्रथम विमा कवच स्वतःच्या खर्चातून देण्यासाठी ते पुढे आले. जिल्ह्यात कोणतीही समस्या उद्भवल्यास नितेश राणे तिथे सर्वप्रथम पोचतात. सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहून आपल्या समाजाभिमुख कार्याने जिल्हावासीयांची मने जिंकणाऱ्या युवा आमदार नितेश राणेंचा वाढदिवस.
संवाद मिडिया परिवाराकडून आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − 2 =