You are currently viewing चिरोटे

चिरोटे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित पाककृती*

 

*चिरोटे…*

 

चिरोटी रव्याला मोहन घालून दूधपाण्याने भिजवायचे.मुरल्यावर पातळ पात्या पोळीहून मोठ्या लाटून

दोन पात्यांना पातळ तूप आणि तांदूळ पिठी भुरभुरून घड्या अलगद घालायच्या.सुरीने छोटे

चौकोनी कापून हलक्या हाताने पुरीपेक्षा जरा जाड लाटून मध्यम आचेवर रिफाईंड तेलात खुसखुशीत तळून घ्यायचे.

रव्याच्या निम्मे साखरेचा पक्क्यापेक्षा जरा कमी असा पाक करून पाकात आंबूसपणासाठी लिंबू पिळावे..चवीनुसार.. ,तेल चांगले निथळून तळलेले चिरोटे चारपाच पाकात खालीवर करून काढून ताटात ठेवायचे.

उरलेलेही तसेच पाकात बुडवून काढायचे.जरा थंड झाले की पाक छान धरतो चिरोट्यांना.

साध्या चिरोट्यावर पिठी साखरही हवी तशी कमी जास्त घालून कोरडे ठेवता येतात.साधे च ठेवले तर गोड,मसाल्याच्या लोणच्यासोबतही खूप चवदार लागतात.बघाच करून..खुसखुशीत चिरोटे!

 

👍👌😄😋😋

अरुणा दुद्दलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा