You are currently viewing आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा

आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा

*आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा*

*आ. वैभव नाईक यांची सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना*

कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन आंबेरी पुलावरून वाहतूक सुरु करण्याची सूचना आज आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता सीमा गोवेकर, शाखा अभियंता श्री. पाटील यांना दिली. दरम्यान आ. वैभव नाईक यांनी आंबेरी पुलाची पाहणी देखील केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, बंड्या कुडतरकर आदी उपस्थित होते.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आंबेरी पुलासाठी बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून घेतले होते या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आलेली नाही. याठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच सध्या वाहतूक सुरु आहे हा जुना पूल जीर्ण झाला असून पावसाचा जोर वाढला असल्याने तो पूल पाण्याखाली गेल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून नवीन पुलाच्या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन पुलावरून वाहतूक सुरु करण्यात यावी अशी सूचना आ. वैभव नाईक यांनी सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 2 =