You are currently viewing इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उभाबाजार येथे आयोजन; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी :

भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सावंतवाडी शहरातील उभाबाजार, ज्वेलरी पेठ येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सावंतवाडी शहरातील उभाबाजार, ज्वेलरी पेठ येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, महिला काँग्रेस, सेवा दल, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच माजी नगरसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसूरकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तौकीर शेख, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी, महिला शहर काँग्रेस अध्यक्ष सौ. सुमेधा सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर आणि शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा