You are currently viewing 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने

7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने

सिंधुदुर्गनगरी

 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करुन त्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी दिली.

            युवक-युवती, युवक महिला मंडळे, योग प्रेमी नागरिक, अधिकारी/कर्मचारी तसेच जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालय आदी यामध्ये सहभागी झाले होते. हा कार्यक्रम गुगल मिटला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता.

            या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी संजीता महोपात्रा, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, योग निसर्गउपचार तज्ञ साधना गुरव, लेखा कार्यक्रम सहाय्यक अपेक्षा मांजरेकर तसेच नेहरु युवा केंद्राचे कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. योन निसर्गउपचार तज्ञ साधना गुरव यांनी विविध योग प्रात्यक्षिके करुन दाखविली. तसेच कार्यकमाचे गुगल मिट लिंक होस्ट मोहितकुमार सैनी हे होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − one =