You are currently viewing मुंबई प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष प्रविण नाईक यांची धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळावर संचालक म्हणून निवड

मुंबई प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष प्रविण नाईक यांची धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळावर संचालक म्हणून निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ कालेली, ता.कुडाळ येथील रहिवासी जिल्ह्याचे सुपुत्र प्रविण नाईक यांची मुंबई प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण नाईक यांचे बालपण सावंतवाडीत गेले, तर शिक्षण मुंबईत झाले. माजगाव गरड येथे माठेकर त्यांचे आजोळ, सावंतवाडी माठेवाडा येथील मामा माठेकर यांचे ते भाचे होय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रविण नाईक यांची उपाध्यक्ष पदी निवड केली.

प्रविण नाईक यांनी मुंबई येथूनच एनएसयुआयच्या माध्यमातून युथ काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला होता. गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. दादर वरळी मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांनी दहा वर्षे कार्यरत होते. अमेरिका येथे दोन व कॅनडा येथे एक अशी विदेशात तीन सिद्धिविनायक मंदिरे त्यांनी उभारली.
प्रविण नाईक यांची १४ शाळा आणि ३ महाविद्यालय असलेल्या धी बांदा नवभारत शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीवरही निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे हे प्रविण नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. जिल्ह्याचा सुपुत्र मुंबई प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झाल्याने जिल्ह्यासाठी ही अभिनंदनीय गोष्ट आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =