You are currently viewing सिंधुदुर्ग भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील श्री.रमण वायंगणकर…..

सिंधुदुर्ग भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील श्री.रमण वायंगणकर…..

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सर्वसाधारण सभा कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे शासनाचे कोविड विषयक मार्गदर्शक तत्वे पाळून पार पडली. जिल्हा कार्यकारिणीच्या या सर्वसाधारण सभेत सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील श्री रमण शंकर वायंगणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्हा सरचिटणीस पदी श्री विकास वैद्य यांनी निवड करण्यात आली. जिल्ह्याचे माजी सरचिटणीस श्री राजू गवंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घेण्यात आली, जिल्हा सरचिटणीस श्री वैद्य यांनी मागील सर्व जमाखर्च अहवालाचे कार्यकारिणी समोर वाचन करून दाखवले. अध्यक्ष निवडीनंतर इतर कार्यकारिणी पदाधिकाऱयांच्या निवडी करण्यात आल्या. सरचिटणीस पदी वेंगुर्ला येथील विकास वैद्य तर जिल्हा महासंघ कार्याध्यक्ष पदी देवगडचे हेमंत करंगुटकरांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी मालवण चे सुनील नाईक व दोडामार्ग येथील संजय खडपकर यांच्या निवडी करण्यात आल्या. तर सहसचिव पदी सावंतवाडीचे उल्हास हळदणकर व प्रसिद्धी प्रमुख आणि सहसचिवपदी कुडाळचे समील जळवी यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी कणकवलीचे लक्ष्मीकांत मुंडये यांची एकमताने निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकारी निवडीनंतर माजी सरचिटणीस यांच्याकडून नूतन सरचिटणीस यांनी महासंघाच्या संपूर्ण दफ्तराचा कार्यभार स्वीकारला. भंडारी महासंघाच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, रमण वायंगणकर, जयप्रकाश चमणकर, समील दळवी, राजू गवंडे, सुनील नाईक, श्रीकांत वेंगुर्लेकर, प्रकाश पावसकर, गजानन वेंगुर्लेकर, विकास वैद्य, शरद पावसकर, विलास आसोलकर, संजय खडपकर, मोहन गवंडे, परितोष गवंडे इत्यादींसह जिल्ह्यातील इतर भंडारी बांधव उपस्थित होते. रमण वायंगणकर यांच्या निवडीने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा