You are currently viewing अजिंक्य गवस यांना ”युवा कला गौरव” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अजिंक्य गवस यांना ”युवा कला गौरव” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

दोडामार्ग

झोंळबे गावचे सुपुत्र तथा नवोदित युवा दशावतारी कलाकार अजिंक्य शिवाजी गवस यांच्या दशावतार कलेतील अल्पावधीतील योगदानाची पुण्यातील आर्ट बिटस् फौंडेशनने दखल घेतली असून त्यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र ” युवा कला गौरव ” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.

युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोककला या कला विभागातील हा राज्यस्तरीय पुरस्कार असुन ऑनलाईन पध्दतीने हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने अजिंक्य गवस यांच्या लोक्कलेतील योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरिय आदर्श युवा युथ आयडाॅल कलारत्न पुरस्कार प्रदान केला होता.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 16 =