You are currently viewing तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने वाचवले वेंगुर्ला समुद्रातून खलाशांचे प्राण

तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने वाचवले वेंगुर्ला समुद्रातून खलाशांचे प्राण

वेंगुर्ला

भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे. गोव्यातील चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला निवती रॉक दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या थरारक शोर्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तटरक्षक दलानं ट्विटकरून याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 2 =