सारथीची बैठक समाधानकारक

सारथीची बैठक समाधानकारक

13 मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपतींची माहिती

पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची नवीन सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली आहे. सारथी संस्थेसंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून सरकारने आपल्या 13 मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर प्रश्नांवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात ही बैठक पार पडली. यात अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे :

 

  • सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.

 

  • सारथी संस्थेला स्वायत्त देण्यात आली.

 

  • 13 मागण्या मान्य केल्यात. यात 8 विभागीय कार्यालय होणार. पहिले कार्यालय कोल्हापूरला होणार आहे.

 

  • 1000 हजार कोटी आणि इतर मागण्यांसाठी 21 दिवस लागणार असल्याची माहिती.

 

  • समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सारथीवर घेणार असल्याचे आश्वासन

 

  • संभाजीराजेंना अजिबात सारथीत इंटरेस्ट नाही, समाजासाठी हवं आहे.

 

  • वसतिगृह सारथीच्या माध्यमातून होणार आहेत. 9 ते 10 वसतिगृह होणार. युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे.

 

  • तारदूत प्रकल्प सुरू होणार. काही तांत्रिक आहे ते होईल.

 

  • अजितदादा शाहू महारज यांना भेटले याची मला कल्पना नाही. ते आशीर्वाद घ्यायला गेले असतील.

 

  • सारथीच्या चर्चेची सुरुवात चांगली झाली हे महत्वाच.

 

  • सगळे मुद्दे पूर्ण केले आहेत.

 

  • मूक आंदोलन मागे घेतलं नाही, 30 तारखेला याचा निर्णय घेण्यात येईल.

 

 • पीएचडी फेलोशिप चर्चा झाली, काही कायदेशीर बाबी आहेत. त्यानुसार जावे लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा