You are currently viewing सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचा एक हात मदतीचा…!

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचा एक हात मदतीचा…!

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गरजू 110 कुटुंबांना घरी जाऊन केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिंधुदुर्गनगरी

प्रत्येक मोठ्या कामात ‘खारीचा वाटा’ हा फार मोलाचा ठरतो. असाच खारीचा वाटा स्वतःपासून सुरू करून सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इतरांनाही प्रेरणा दिली आहे. हातावर पोट असणाऱ्या रोजंदारीवर जगणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या 110 गरजू कुटंबांना जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप केले आहे. या कार्याची खासदार विनायक राऊत यांनीही दखल घेऊन देणगी दिली.

            कोविड -19 च्या या भयंकर महामारीत लॉकडाऊन सारख्या समस्येला सामोरे जाताना हातावर पोट असणाऱ्या मोलमजूरी करणाऱ्या समाजातील कुटुंबांसमोर रोजची समस्या उभी ठाकली आहे. पहिल्या लाटेच्या वेळेस अशा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी बऱ्याच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला होता. दुसऱ्या लाटेच्या वेळेस समाजातील थोड्या फार फरकाने अनेक थरातील लोकांना आर्थिक चणचण भासू लागली. अशा वेळी सर्व प्रथम सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतः वर्गणी देऊन 10 अत्यंत गरजू कुटुंबांना घरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हे कर्मचारी भारावून गेले.

            अशाच आणखी गरजू कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याची संकल्पना पुढे आली. श्री. खांडेकर यांनी व्हॉट्स ॲप गटाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या अहवानास अप्ल वेळेत अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी पैशे स्वरुपात तर काही व्यक्तींनी वस्तू स्वरुपात मदत केली. तलाठ्यांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील अत्यंत गरजू कुटुंबांची माहिती घेऊन त्याची यादी तयार करण्यात आली आणि अशा 110 गरजू कुटुंबांना मदत पोहचवण्यात आली. अद्यापही 100 कुटुंबांना मदत पोहचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा उपक्रमासाठी देणगी देणाऱ्या व्यक्तींना कृतज्ञतेच्या भावनेने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यालयाकडून ऋणनिर्देश प्रमाणपत्र देण्यात येते. खासदार विनायक राऊत यांनीही या  उपक्रमाची दखल घेऊन कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय देणगीही दिली. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपलाही हातभार लावण्यास हरकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + seventeen =