शिवडाव धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  

शिवडाव धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  

सिंधुदुर्गनगरी

उपविभागांतर्गत असणाऱ्या लघु पाटबंधारे  योजना  शिवडाव या धरणाची पाणी पातळी आज दिनांक 21 जून 2021 रोजी तलांक 118.50 मी झाली असून पुढील 2 ते 4 दिवसात सांडव्यावरुन विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदी, नालाप्रात्रातील पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी, नाल्याकाठच्या लोकांना इशारा देण्यास येतो की नदीपात्रात,नाल्यास उतरु नये व सावधानता बाळगावी. नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क रहावे असे उपविभागीय अभियंता पाटबंधारे बांधकाम  उपविभाग क्र.1 कणकवली यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा