कणकवलीत तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
भारतीय सैन्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान : ना.नितेश राणे
कणकवली :
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. शहरातील पटकीदेवी मंदिर येथून शुक्रवारी सायंकाळी ५:३० वा. बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयपर्यंत ही तिरंगा रॅली यात्रा निघाली होती. दरम्यान यावेळी, भारत माता की …. जय, वंदे…. मातरम, अशा घोषणा देत ही तिरंगा रॅली यात्रा मार्गस्थ झाली होती. कणकवली येथील तहसीलदार कार्यालयाजवळ राष्ट्रगीताने या तिरंगा रॅली यात्रेचा समारोप करण्यात आला.
तिरंगा रॅली यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, लोकप्रतिनिधी, वकील, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते.
या तिरंगा रॅली यात्रेत, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी आ. अजित गोगटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवमोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप साटम, युवमोर्चा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, माजी जि. प. सदस्य सावी लोके, ॲड. उमेश सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, मेघा गांगण, कविता राणे, मनोज रावराणे, सचिन पारधीये, बबलू सावंत, रमेश जोगळे, दादा कुडतरकर, सुभाष मालंडकर, दादा कुडतरकर, किशोर राणे, चारु साटम, समीर प्रभुगावकर, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. ङी. सावंत तालुका उपाध्यक्ष बाबू परब मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालंडकर, वैभववाङी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, देवगड प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे, प्रज्ज्वल वर्दम तसेच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस आदी सहभागी झाले होते.