महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत

महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत

आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथील शिंदे कुटुंबियांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली.

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली.

सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

प्रतिक्रिया व्यक्त करा