You are currently viewing कणकवलीत नगरपंचायतचा उपक्रम..

कणकवलीत नगरपंचायतचा उपक्रम..

कणकवलीत भटक्या कुत्र्याच्या निर्बिजिकरण व अँन्टी रेबीज लसीकरण मोहिमेला सुरवात – आम.नितेश राणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ !

कणकवली :

कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आपण पुढाकार घेवून शहरात मोहीम राबवली होती. मात्र दुरदैवाने त्या मोहिमेतील डॉक्टरांनीच माघार घेतली. भटक्या कुत्र्याचं त्रास हा शहरा पुरता मर्यादित नसून ग्रामीण भागात हि तेवढाच आहे. आपल्या संस्थेद्वारे जिल्ह्यासाठी हा उपक्रम राबवून आपण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठीचे सर्वोतोपरी मदत आपण करू अशी ग्वाही आम. नितेश राणे यांनी दिली.                                                                                                         कणकवली नगरपंचायत कणकवली सर्वेक्षप २०२१ आणि सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानाचे निर्बिजिकरण व अँन्टी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर, विराज भोसले, कविता राणे, बंडू गांगण, महेश सावंत, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल बेंबाटकर, संस्थेचे समन्वयक सचिन देवूडकर, मॅनेजर विजय पाटील, सदस्य आदी उपस्थित होते.

कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांने निल सावंत (९ वर्ष ) बालकाचा चावा घेतला होता.त्याचवेळी भटक्या कत्र्यांच्या बंदोबस्त करण्याचा विडा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उचलला. अन जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम सत्यात उतरवला. त्याची सुरुवात आज सकाळ पासून करण्यात आली.  हे काम सोसायटी फॉर अँनिमल प्रॉटेक्शन या संस्थेने घेतले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्या टीमचे अभिनंदन आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन केले.

या उपक्रमास आवश्यक असलेल्या सेंटरसाठी आमदार नीतेश राणे यांनी हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडच्या नजीक जागा उपलब्ध करून दिली आहे. सचिन देऊलकर म्हणाले, आमच्या कामाची सुरुवात दररोज सकाळी ५.३० वा. पासून सुरु होईल. यात कुत्र्यांना जाळ्यांचा तसेच आमच्या ‘स्किल’ चा वापर करून पकडले जाईल. कुत्र्यांना ताब्यात घेतलेल्या ठिकाणी एक नंबर दिला जाईल व तोच नंबर कुत्र्याच्या कानावरही दिला जाईल. पुढे सेंटवर आणून लसीकरण वगैरे प्रक्रिया व नंतर नसबंदी केली जाईल. या सर्व प्रक्रिया तीन दिवसांमध्ये केल्या जातील. त्यानंतर या कुत्र्याला जेथून ताब्यात घेतले, त्याच ठिकाणी आणून सोडले जाईल. नसबंदी झाल्यामुळे नव्याने पिल्ले जन्माला येणे बंद होईल. तसेच विशेषत : श्रावण, भाद्रपद महिन्यामध्ये विशिष्ट कारणास्तव कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवरून धावण्याचे प्रकार दिसतात. या गोष्टी नसबंदीमुळे कमी होतील, या उपक्रमासाठी ११ जणांची टिम आहे. कुत्र्याला हाताळणे, गरजेनुसार औषधोपचार करणे, पुढे लसीकरण, नसबंदी आदींसाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल बेंबाटकर, विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही टिम कार्यरत असल्याचेही देऊलकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + sixteen =