You are currently viewing अवैध दारू तस्करीच्या गुन्ह्यातील सराईत वॉन्टेड प्रदीप पाटील सह पाच आरोपी गजाआड.

अवैध दारू तस्करीच्या गुन्ह्यातील सराईत वॉन्टेड प्रदीप पाटील सह पाच आरोपी गजाआड.

शासनाने बक्षीस जाहीर केलेल्या आरोपीस पकडत राज्य उत्पादन खात्याची धडाकेबाज कामगिरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सराईत दारू तस्कर राज्यात आणि राज्याबाहेर गोव्यातील दारू तस्करीचा अवैद्य व्यवसाय करतात. खाकी वर्दीशी हातमिळवणी करत कित्येकदा हे सराईत दारू तस्कर मोठ्या प्रमाणावर दारुसाठा मोठमोठ्या गाड्यांमधून आणि कित्येकदा महागड्या चारचाकी गाड्या भरून वाहतूक करून करोडोंचा माल जमावतात. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील गुन्ह्यातील गोवा तस्करीतील सराईत आरोपी प्रदीप अर्जुन पाटील, रा.माठेवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग हा गेली दोन वर्षे फरारी होता. त्याचेवर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस खात्याकडे अधिक गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने आरोपीस पकडणाऱ्यास बक्षीस देखील जाहीर केले होते.
15/06/21 रोजी सदर फरारी आरोपी हा किणी टोलनाका, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे येणार असल्याची गोपनीय खबर मिळताच उपअधीक्षक तथा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी, निरीक्षक सीमा तपासणी नाका, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर, निरीक्षक हातकणंगले,दुय्यम निरीक्षक कोल्हापूर शहर, दुय्यय निरीक्षक शाहूवाडी, व स्टाफ सह सापळा लावून फरार आरोपी प्रदीप अर्जुन पाटील सहित इतर चार इसमांना पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई कंपनीच्या क्रेटा (RDi SXCO) गाडी नंबर MHO7 AG 9199 मधून प्रवास करीत असताना पहाटे 4.45 वाजता किणी टोलनाका, किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे ताब्यात घेतले आहे. यावेळी ह्युंदाई कंपनीची पांढऱ्या रंगाची MHO7 AG 9199 नंबर ची क्रेटा (RDi SXCO), रोख रक्कम 384630/-, गोवा बनावटीच्या रॉयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिली. च्या 48 बाटल्या, गोवा ब्रॅंडी 180 मिलीच्या 48 बाटल्या (एकूण दोन बॉक्स), सदर इसमाच्या अंगावरील अंदाजे 9 तोळे सोने, सदर इसमांच्याकडील 8 मोबाईल संच, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून सदर कारवाईत एकूण 18,84,230/- इतक्या किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई करताना आरोपी प्रदीप पाटील याच्यासोबतच इतर चार इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यात 1)प्रकाश अर्जुन पाटील, वय 49, रा. माठेवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, 2)अजय सूर्यकांत कवठणकर, वय 23 रा. ओटवणे, ता.सावंतवाडी, जि सिंधुदुर्ग, 3)रोहित दत्ता साळगावकर, वय 25, रा.कोलगाव, ता.सावंतवाडी जि सिंधुदुर्ग, 4)मंदार दत्ता साळगावकर, वय 29, रा.कोलगाव, ता सावंतवाडी, जि सिंधुदुर्ग. यांना वरील मुद्देमालासहित ताब्यात घेत पुढील कारवाई करिता निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई, श्री.कांतीलाल उमाप, मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री सुनील चव्हाण, मा. संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. विभागीय उपआयुक्त तथा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग श्री वाय एम पवार, यांचे मार्गदर्शनाखाली श्री पी आर पाटील उप अधीक्षक तथा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी, श्री संभाजी बरगे, निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूर तथा हातकणंगले, श्री राजन साळोखे, निरीक्षक सीमा तपासणी नाका, श्री आर के गुरव, दुय्यम निरीक्षक, इचलकरंजी श्री अभिनंदन कांबळे, दुय्यम निरीक्षक कोल्हापूर शहर, श्री अतुल पाटील दुय्यम निरीक्षक शाहूवाडी, श्री प्रकाश पाटील दुय्यम निरीक्षक, हातकणंगले, श्री श्री बी एल पाटील, दुय्यम निरीक्षक करवीर, श्री नडे दुय्यम निरीक्षक भरारी पथक कोल्हापूर, श्री संदीप येवलूजे स.दु.नि.हातकणंगले, जवान श्री विलास पवार, सुभाष कोले, बनसोडे, जानकर इत्यादींनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + twenty =