You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण कर्मचारी कै.तनय सावंत यांच्या कुटुंबास विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत…

वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण कर्मचारी कै.तनय सावंत यांच्या कुटुंबास विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत…

कुडाळ

वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण रेडी विभागातील शाखा कार्यलात वीज वाहिनीवर काम करत असताना कै तनय सावंत यांचे विजेचा धक्का बसून निधन झाले होते. युवा नेते व विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष विशाल परब यांनी सावंत यांच्या कुटुंबालाआज कुडाळ येथील महावितरण अधिकारी यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्त केली.

यावेळी माजी जि प अध्यक्ष व भाजप नेते अशोक सावंत, महिला मोर्चा भाजप जिल्हा अध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, माजी सभापती प्रिंतेश राऊळ,नगरसेवक निलेश परब, अजय आकेरकर, नंदू राणे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

वेंगुर्ला उपविभाग अंतर्गत शाखा कार्यालय रेडी येथे कार्यरत बह्यास्त्रोत कर्मचारी तनय सावंत यांचा दिनांक ७/९/२०२२ रोजी कामावर असताना अपघात झाला होता.. त्यांना पुढील उपचाराकरिता धारगळ (गोवा) येथील रेडकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता दिनांक १०/९/२०२२ रोजी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. तनय सावंत यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कुटुंबाचा आर्थिक आधारच हरपला होता. ही बाब विशाल परब यांचया निदर्शनास येताच तनय यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार विशाल यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार विशाल परब यांनी आज आर्थिक मदत सुपूर्द केली.

विशाल परब यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. संकटात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदतीचा हात देण्यासाठी मी सदैव अग्रेसर राहीन, संकटाच्या काळात जात धर्म आणि पक्ष न पाहता मदत करणे हा राणे साहेबांचा संस्कार आहे,अशी भावना विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − eight =