वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस : अनेक रस्ते पाण्याखाली

वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस : अनेक रस्ते पाण्याखाली

आकेशियाचे झाड पडल्याने वैभववाडी – गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

वैभववाडी

मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मो-या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे. वैभववाडी – गगनबावडा मार्गावर एडगाव नजीक रस्त्यात आकेशियाचे झाड पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

करुळ घाट मार्गात चिखलमाती आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रात्रभर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. मात्र सकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्यांना पुर आला आहे. पावसाने जोर असाच राहील्यास रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा