You are currently viewing पणदूर-घोडगे मार्ग अज्ञात व्यक्तींनी झाड आडवे टाकून अडवला…

पणदूर-घोडगे मार्ग अज्ञात व्यक्तींनी झाड आडवे टाकून अडवला…

नारायण राणेंच्या अटकेचे पडसाद; दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प…

कुडाळ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पणदूर-घोडगे मार्गावर अज्ञात व्यक्तींकडून झाड आडवे टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे.हा प्रकार डीगस व आवळेगाव येथे करण्यात आला आहे. तर पणदुर बाजारपेठही बंद करण्यात आल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा