You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या नवीन संगणक लॅब चे राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते उद्घाटन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या नवीन संगणक लॅब चे राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागासाठी 32 कॉम्प्युटर्सनी सुसज्ज लॅबचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल IQAC कॉर्डिनेटर डॉ. बी एन हिरामणी , संगणक शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख सौ विभा गवंडी ,माहिती तंत्रज्ञान विभागाच्या
विभागप्रमुख सौ. अक्षता गोडकर, प्रा. सौ.एस एस नाईक,प्रा. आदित्य वर्दम, प्रा. सुरज सावंत, प्रा.प्रनाम कांबळी, प्रा. तन्वी शिंदे, सिद्धिविनायक सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नवीन कम्प्युटर लॅब मध्ये 32 काॅम्पुटर्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा