वेंगुर्लेत उद्या १६ जुन ला ग्रामीण रुग्णालया समोर “लक्षवेध अभियान ” आंदोलन

वेंगुर्लेत उद्या १६ जुन ला ग्रामीण रुग्णालया समोर “लक्षवेध अभियान ” आंदोलन

शासनाच्या निषेधार्थ भाजपा तर्फे आयोजन : जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांची माहिती”

वेंगुर्ले

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण सापडत असताना तालुक्याच्या ठीकाणी एक व्हेंटीलेटर नाही ही शोकांतिका आहे, याला आरोग्य विभागा बरोबर महाविकास आघाडी सरकार व त्या सरकार मधले पालकमंत्री व आमदार जबाबदार आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” लक्षवेध अभियान ” आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक १६ जुन रोजी सकाळी ११ =०० वाजता ग्रामीण रुग्णालया समोर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन व जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार याची दक्षता घेऊन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी दिली.

एका बाजूने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची परीस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. भारतीय जनता पार्टीने कोरोनाच्या लढ्यात वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य केले. परंतु ज्याप्रमाणे प्रशासनाने इतरांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे होते तसे काम होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्याची पर्यायाने वेंगुर्ले तालुक्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे.

वेंगुर्ले मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली हाॅस्पीटलची इमारत वापरावीना बंद स्थीतीत आहे. माजी पालकमंत्री व आमदार दिपक केसरकर नेहमीप्रमाणे बैठकांवर बैठका घेत आहेत परंतु त्याचा उपयोग शून्य. दिवसेंदिवस रुग्ण सापडत असताना तालुक्याच्या ठीकाणी एक व्हेंटीलेटर नाही ही शोकांतिका आहे, आणि या परीस्थितीला महाविकास आघाडी सरकार व त्या सरकार मधले पालकमंत्री व आमदार जबाबदार आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” लक्षवेध अभियान ” आंदोलन करण्यात येणार आहे.

बुधवार दिनांक १६ जुन रोजी सकाळी ११ =०० वाजता ग्रामीण रुग्णालया समोर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन व जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा