You are currently viewing राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब…

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी असलम मोहम्मद खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याकचे राज्य प्रमुख इद्रिस इलियास नायकवडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम हाजी बुऱ्हाण यांच्या उपस्थित ही नियुक्ती करण्यात आली आहे. असलम खतिब हे राष्ट्रवादीचे गेली अनेक वर्षे कार्यकर्ते म्हणून विविध सामाजिक कामात अग्रेसर असतात.

लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्व समावेशक विचारधारा इथल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटनेने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण सुयोग्यरितीने सांभाळाल हा विश्वास आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच आपल्या विभागातील जनसामान्यांना अपेक्षीत असलेले समाजहिताचे कार्य करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा कराल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावाल असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. यानिमित्ताने श्री. खतीब यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफिक खान, जिल्हा उपाध्यक्ष सर्फराज नाईक, संदीप राणे, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, राजू पावसकर, संदीप पेडणेकर, गुरूदत्त कामत, रोहन परब, महिला तालुकाध्यक्ष पुजा पेडणेकर, ऐश्वर्या कदम, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, सुशिल चमणकर, प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे, प्रसाद कुलकर्णी, गणेश चौगुले व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + five =