खा. नारायण राणे बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार

खा. नारायण राणे बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्य स्थितीतील हालाखीच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी  भाजपा नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे बुधवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात रिक्त असलेले जिल्हा शल्यचिकित्सकांचे पद त्वरित भरायला लावणार असून आपण समक्षच ऑर्डर करायला लावणार आहे, असे ते म्हणाले. तसेच फिजीशीअन, डॉक्टर्स, नर्स व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित देण्याची आग्रही मागणी करणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

कोलगाव येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प. च्या आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, जिल्हा चिटणीस महेश सारंग व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा