राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन व ॲड. हितेश कुडाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन व ॲड. हितेश कुडाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..

कुडाळ :

 

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन सप्ताह कार्यक्रमानिमित्त तसेच  युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व युवा फोरम संस्था सचिव ॲड. हितेश कुडाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथील महिला रुग्णालय कोविड सेंटर तसेच कुडाळ ग्रामीण रुग्णालय मध्ये खाद्यपदार्थ व फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच कुडाळ पोलीस स्टेशन येथे पेय वाटप, व माणगाव येथे ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, युवक जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सर्फराज नाईक, हमिद शेख, परवेज मुजावर,कुडाळ शहर अध्यक्ष संग्राम सावंत,जयराम डिगसकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर,जिल्हा चिटणीस सनी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष हासीम मुजावर,प्रशांत पाताडे,जिल्हा सरचिटणीस ॲड. हितेश कुडाळकर,प्रतीक सावंत, कुडाळ उपशहराध्यक्ष प्रकाश वेंगुर्लेकर,अमित कोरगावकर, अमित केरकर,केदार भोसले अमित कोरगावकर , दिनार खानविलकर, दिनेश खानविलकर  हार्दिक शेगले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा