You are currently viewing ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा; नितेश राणे

ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा; नितेश राणे

ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा; नितेश राणे

शिवसेनेचे उबाठा मंडळ केले त्या अवमूल्यन वर लेख लिहा,राऊत यांना सुनावले

कणकवली

आदित्य ठाकरे दिनो मोरया च्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का ? की सत्य नारायण पूजेला जायचा ? याचे उत्तर आदी द्या आणि मग अमली पदार्थ विषयी बोला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरे मध्येच उठून गेलेला. तेव्हा कुठल्या नशेत होता ? हे विचारा.
तुझा मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे. कोणकोणत्या ड्रग माफिया सोबत पार्टी करतो ते सांगायला लावू नका.ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कोरोना नंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. आज जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानी आहे.येत्या काही वर्षात तिसऱ्या स्थानी असणार.ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाही अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता.उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत उबाठा नावाचं छोट मित्रमंडळ झाला आहे. याबाबत राऊत ने अग्रलेख लिहीवा असा टोला लगावला.तुझ्या सारख्या चवंनी लोकांनी ही अवस्था स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संघटनेची केली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा वर येऊन राहायचा तो ड्रग वालाच ना.ड्रग आणि ठेकेदारी बद्दल तुम्ही बोलूच नका. बीएमसी चे टेंडर कोणाला दयायचे ते सांगावं लागेल मग तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल.आणि तुझा बोनस बंद करेल त्यामुळे तुझे तोंड बंद कर.दुसऱ्यांना नौटकी बोलण्या अगोदर राऊत चा आयुष्य तमासगीर सारख आहे. तमासगीर ते तरी प्रामाणिक असतात.दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा.उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेल मध्ये असेल असा इशारा यावेळी दिला.

मनोज जरांगे पाटील हे माझे समाज बांधव आहेत. त्याची चिंता काल होती आज आहे उद्या ही राहील.असे आमदार नितेश राणे म्हणाले.जरांगेना धोका आहे असे जी राऊत सारखी टवाळकी बोलत आहेत. त्याचा काही हात असेल का ? म्हणून मी त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली.मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला नवीन वर्षात आनंदाची बातमी देऊ.घरफोडी जाळपोळ करणारे मराठे नाहीत. हल्ले करणारे बिगर मराठा आहेत. हिशोब चूकता करण्यासाठी ते करत आहेत.लोकशाही मध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण आपल्याला भेटणार आहे संयम ठेवला तर कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 19 =