You are currently viewing एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी ..

एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी ..

प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथे उपक्रमाचा शुभारंभ

सावंतवाडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथील गरजू ५३ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग व जात पडताळणी प्रमाणपत्र समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथे सामाजिक न्याय दिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या दिवसाचे औचित्य साधुब दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी छत्रीचे वाटप प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथील गरजू विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले. या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्गचे कापडी साहेब व इतर अधिकारी वर्ग तसेच माननीय प्रमोद जी जाधव उपायुक्त जात पडताळणी प्रमाणपत्र समिती सिंधुदुर्ग, ना.गो.स.ए मंडळ बोर्डवे चे अध्यक्ष भालचंद्र गोसावी प्राथमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक आनंद कर्पे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या छत्री वाटप उपक्रमासाठी जयश्री पेडणेकर यांनी त्यांच्या आई कौमुदी हरी खोत हिच्या स्मरणार्थ ५ छत्र्या, राजेंद्र राऊळ ५ छत्र्या, केंद्रप्रमुख धोंडू रेडकर ५ छत्र्या, प्रिया माळकर ५ छत्र्या, गुरुप्रसाद जिकमडे ५ छत्र्या, तानाजी कुंभार ५ छत्र्या, प्रशांत धोंड १ छत्री, उत्कर्षा वेंगुर्लेकर ३ छत्र्या, सचिन धुरी २ छत्र्या, सारिका वारंग १ छत्री, स्नेहलता राणे २ छत्र्या, मंदार शामसुंदर वारंग २ छत्र्या, उमेश माळकर २ छत्र्या, अवधूत रामदास १ छत्री, स्मिता नलावडे २ छत्र्या, संदेश गोसावी १ छत्री, श्वेता नाईक २ छत्र्या, राजेंद्रप्रसाद गाड २ छत्र्या, हृदयनाथ गावडे २ छत्र्या सौजन्य केले.

सर्व दात्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून विशेष आभार मानण्यात आले आहेत. तसेच गरजूंना मदत करताना छायाचित्र काढणे योग्य नसलेने सदर उपक्रमाचा फोटो काढण्यात आलेला नाही.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करू शकता अथवा या उपक्रमासाठी एक छत्री देऊन सहकार्य करू शकता. (छत्री सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना छत्री वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल) या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा ९८६०२५२८२५ व ९४२२२६३८०२ च्या माध्यमातून संदेश पाठवा असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा