You are currently viewing हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जनतेसाठी संजीवनी ठरेल; आमदार नितेश राणे

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जनतेसाठी संजीवनी ठरेल; आमदार नितेश राणे

कणकवली तालुक्यातील जनतेने उपचाराचा,सोई, सुविधांचा फायदा घ्यावा,केले आवाहन

कणकवली

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची संकल्पना आहे. ही संकल्पना राज्यात यशस्वी झाली. तशीच कणकवली मध्ये सुद्धा यशस्वी होईल. जनतेला या दवाखान्याचा पुरेपूर फायदा होईल असे काम करा.पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार फैलावत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून काम करावे.असे आवाहन आमदार राणे यांनी केली.
कणकवली राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ व्या वित्त आयोग अंतर्गत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील जि. प. शाळा नंबर ४ च्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आला आहे. याचे लोकार्पण आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कांबळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी सभापती प्रकाश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, जि. प. चे माजी सदस्य रवींद्र जठार, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, प. सं.चे कक्ष अधीक्षक सी. डी. परब, सामान्य विभागाच्या अधिकारी मनीषा देसाई, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, डॉ. सतीश गोसावी, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना असून ती राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. तालुक्यात आपला दवाखाना सुरु झाला असून या दवाखान्याच्या माध्यमातून याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन तो समाधानाने परत जाईल, याची काळजी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.डॉ. सई धुरी म्हणाल्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगली संकल्पना आहे. यांतर्गत सिंधुदुर्गसाठी ७ आपले दवाखाने मंजूर झाले आहेत. वेंगुर्ले, देवगड तालुक्यात आपला दवाखाना सुरु झाला असून आजपासून कणकवली आपला दवाखाना सुरु होत असून याचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. दवाखानाच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात लोप्टोस्पायरेसीस फैलाव होत असतो. मात्र, यंदा त्याचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामस्तरावर उपाययोजना केल्या आहेत. तसेच साथीच्या आजार व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सतर्क असून ते रोखण्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. याशिवाय मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लहान मुलांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. सई धुरी यांनी सांगितले,यावेळी आपला दखावान्याचे इनचार्ज डॉ. सतीश गोसावी यांचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरंभी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत डॉ. सई धुरी व पूजा काळगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी केले. आभार पूजा काळगे यांनी मानले. या कार्यक्रमाला पं. स. च्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा