You are currently viewing पाणी व स्वच्छता विभागाकडून बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन…

पाणी व स्वच्छता विभागाकडून बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन…

सिंधुदुर्ग :

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अंमलबजावणी करिता ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुशंगाने बोधचिन्ह व बोधवाक्य तयार करण्यासाठी राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या विजेत्यास ५० हजार रुपये रोख बक्षीस देऊन राज्यस्तरावरुन गौरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यालील कलाकार, विद्यार्थी व जाहिरात संस्था, जिल्हावासिय यानी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छ्ता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेकरीता स्पर्धकांनी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामिण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल, असा लोगो पाठविण्याचा आहे. तसेच ब्रिदवाक्य मराठीतुन असणे बंधनकारक असेल. ब्रिदवाक्य मोजक्या शब्द मर्यादेत असावे. या स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकणार आहेत. बोधचिन्ह (लोगो) एकरंगी, बहुरंगी प्रकारत असला तरी चालणार आहे. सहभागी स्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत स्पर्धकांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांचा लोगो अंतिम निवड होईल त्यांना सीडीआर (कोरल ड्रॉ) फाईल्स उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. लोगो अंतिम करण्याचा संपुर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील. स्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी विभागाच्या directorwsso@gmail.com आणि iecwsso@gmail.com या मेल आयडी वर पाठविण्यात यावी. या स्पर्धेकरीता राज्यस्तरावरुन ३० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यत अंतिम वेळ देण्यात आली आहे. तरी सदर नियमावली प्रमाणे जिल्ह्यातील कलाकार, विद्यार्थी, विविध संस्था, जिल्हावासिय यांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रकाश जोंधळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 13 =