You are currently viewing इन्सुली-डोबाशेळ येथे नारळाचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळले…

इन्सुली-डोबाशेळ येथे नारळाचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळले…

सुदैवाने जिवितहानी नाही; मात्र सुर्या पालव यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला..

बांदा :

इन्सुली-डोबाशेळ येथे काल रात्री आंब्याचे झाड रस्त्यावर आणि घरासमोर कोसळल्यानंतर आज सकाळीच पुन्हा एक नारळाचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र सुर्या पालव यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान नारळाचे झाड विद्युत वाहीनीवर कोसळल्याने विद्युत वाहीनी खाली आली होती. सदर वाहिनी खाली पडुन सुद्धा चालुच होती.

पडलेल्या विद्युत वाहिनीच्या बाजूला घर असल्यामुळे घरातील कोणी व्यक्ती बाहेर पडल्यास त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला असता. मात्र बाजुला हॉटेल असल्यामुळे हॉटेल सुर्या चायनीजचे मालक सुर्या पालव यांनी प्रसंगावधान राखून चालू स्थितीतील विद्युत वाहिनी पडलेल्याची कल्पना त्या घरातील सदस्यांना देऊन सतर्क केले, व वायरमनला बोलावून घेत विद्युत प्रवाह बंद केला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 8 =