तळवडे बाजारपेठ ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

तळवडे बाजारपेठ ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

सावंतवाडी :

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर तळवडे बाजारपेठ ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून तळवडे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळवडे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आला.

तर दोन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या तळवडे गावात कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत असून त्या दृष्टिकोनातून उपाय योजना राबविण्यात येत आहे. तशी गावात दक्षताही ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा