You are currently viewing पणदूर येथे भव्य शेतकरी मेळावा व मान्सून धमाका 2022 संपन्न

पणदूर येथे भव्य शेतकरी मेळावा व मान्सून धमाका 2022 संपन्न

कुडाळ (पणदूर) :

 

काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर आयोजित व निर्मल सीड्स प्रा. ली. प्रायोजित शेतकरी मेळावा व मान्सून धमाका सोडत 2022 कार्यक्रमाचे आयोजन रविवार 9 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत सिद्धिविनायक मंगल कार्यालय पणदूर येथे करण्यात आले. प्रगत शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार यावेळी वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला निर्मल सीड्स चे झोनल ऑफिसर श्री जाधव, प्रॉडक्ट प्रमोशनल ऑफिसर श्री सौदागर चव्हाण, पांडुरंग ऍग्रो एजन्सीज व रेम्बो ऍग्रो इंडस्ट्रीजचे मालक विठ्ठल वरक, कावेरी सीड्सचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद पवार, करनुल सीड्सचे विभागीय व्यवस्थापक श्री गोपाळे व इतर नामवंत कम्पन्यांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते यावर्षीचे प्रगत शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार 2022 वितरित करण्यात आले. शेती हाच ध्यास ह्या ब्रीदाने प्रेरित शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सौ क्रांती घाडीगावकर भडगाव. विठ्ठल पालव हुमरमळा, श्री शिवराम पणदूरकर पणदूर, श्री विकास गावडे गावराई, श्री. अशोक राठिवडेकर अणाव या प्रगत शेतकऱ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सोडतीतील 300 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरविले गेले.

श्री सौदागर चव्हाण यांनी निर्मल सीड्स च्या विविध उत्पादन व वापर याबाबत सर्वाना उदबोधित केले. झोनल अधिकारी श्री जाधव यांनी भव्य सोडतीची प्रेरणा घेऊन जैविक शेतीवर भर देण्याचे आवाहन केले. कावेरी सीड्स चे झोनल अधिकारी श्री मिलिंद पवार यांनी भात शेतीचे टप्पे व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. Ab & abc ओरोस चे गजानन चौगुले यांनी रासायनिक शेतीला जैविक शेतीला जोड देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. काजवा शेतकरी सेवा केंद्राच्या संचालिका श्रेया उगवेकर यांनी आपल्या मनोगतात यावर्षी पासून कुपन योजनेत सेंद्रिय व जैविक उत्पादनाचा समावेश केला गेला असून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले. विविध राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ श्रेया उगवेकर व श्रीकांत उगवेकर यांचा यावेळी पांडुरंग ऍग्रो एजेनसीजच्या वतीने श्री विठ्ठल वरक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सोडतिचे पहिले बक्षीसश्री वरक यांनी यावेळी आपणाकडून जाहिर केले.

कार्यक्रम संपल्यानंतर इच्छुक शेतकऱ्यांसह कावेरी सीड्स कम्पनीचा 9090 संकरित वाणाचा पीक पाहणी कार्यक्रम वेताळ बांबर्डे येथे आयोजित केला गेला होता. एक दिवस बळिराजासाठी ही संकल्पना खऱ्या अर्थाने आज यशस्वी झाल्याचीी प्रतिक्रिया शेतकऱ्यातून उमटली.

या कार्यक्रमाला पणदूर गावचे विद्यमान उपसरपंच शिवराम पणदूरकर, विलोवूड क्रॉप सायन्सचे अभिजित दाभोलकर, कावेरी सीड्स चे चौगुले, सागर वराडकर, गोदरेजचे विलास करंगुटकर, हानविका क्रॉप सायन्सचे सुभाष भवर, ab & abc चे गजानन चौगुले, सावंत कृषी कडावल चे सावंत, वृंदावन कृषी ओरोसचे पाताडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निर्मल सीड्सचे जिल्हा क्षेत्र प्रमुख राजू साळुंखे, समर्थ निवतकर, वसंत शिंदे, संतोष हरमलकर, राजू जाधव, प्रज्वल उगवेकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत उगवेकर यांनी केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 13 =