You are currently viewing कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी, ओरोस, वाडी हुमरमळा, वारंगाची तुळसुली, वर्दे-कोकेमळा येथे कंटेन्मेंट झोन

कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी, ओरोस, वाडी हुमरमळा, वारंगाची तुळसुली, वर्दे-कोकेमळा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी :

कुडाळ तालुक्यातील मौजे रानबांबुळी परबवाडी, घर क्र. 262 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2020, मौजे ओरोस देऊळवाडी, घर क्र. 296 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020, वाडी हुमरमळा, तळयाचे टेंब, घर क्र. 337 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020, वारंगाची तुळसुली बुडक्याची, च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2020,  वर्दे कोकेमळावाडी, च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2020, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन  म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =