You are currently viewing सिद्धार्थनगर अंगणवाडीतील मुलांना मोफत गणवेश

सिद्धार्थनगर अंगणवाडीतील मुलांना मोफत गणवेश

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

कणकवली

कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथे असलेल्या अंगणवाडीतील मुलांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. या अंगणवाडी मधील अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकरीता गणवेशाची मागणी केली होती. नगरसेविका मेघा गांगण यांचे या प्रश्नी लक्ष वेधण्यात आले होते. या अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांचे पालक हे गरीब असल्याने त्यांना अशा समाजयोपगी उपक्रमांच्या दरम्यान मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नगरसेविका मेघा गांगण यांनी ही बाब नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी तातडीने या मागणीची पूर्तता केली. याबद्दल त्या मुलांच्या पालकांना मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, उर्वी जाधव, मेघा गांगण, नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, बाळा पाटील, बाळा सावंत, माजी नगरसेवक बंडू गांगण, गौतम खुडकर, संजीवनी पवार, भाई जाधव, अरुण जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा