You are currently viewing शालेय स्पर्धा परीक्षा – गुणवंत विद्यार्थी घडवितात –  मनोज रावराणे

शालेय स्पर्धा परीक्षा – गुणवंत विद्यार्थी घडवितात –  मनोज रावराणे

कणकवली

कणकवली पंचायत समिती आयोजित तालुका परीक्षा समिती पुरस्कृत कणकवली तालुक्यातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत जवाहरलाल नवोदय सराव परीक्षा व मार्गदर्शन वर्ग, तसेच इयत्ता पाचवी सराव शिष्यवृत्ती परीक्षा व मार्गदर्शन वर्ग कणकवली तालुक्यातील सर्व प्रभाग शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. 25 मार्च रोजी प्रभाग शाळेला मनोज रावराणे सभापती पंचायत समिती कणकवली यांनी भेट दिली. प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत साठी सक्षम करण्याकरिता कणकवली पंचायत समिती च्या माध्यमातून विविध उपक्रम मोफत स्वरूपात राबविले जात आहेत. त्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा व आपण गुणवान आहोत सिद्ध करावे. भविष्यात आपल्या सिंधुदुर्गातील सर्वच विभागांमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी असतील हे आम्हा लोकप्रतिनिधींचे स्वप्न आपण पूर्ण करा. आम्ही आपल्या सर्वजण सोबत राहू.

याप्रसंगी कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना कणकवली पंचायत समिती आयोजित व तालुका परीक्षा समिती पुरस्कृत नवोदय व शिष्यवृत्ती सराव परीक्षा मार्गदर्शन वर्ग या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रावर केलेली आजची गुंतवणूक हे उद्याचे भांडवल आहे. आणि भांडवल म्हणजे आपण विद्यार्थी आहात .आपण सर्व विद्यार्थी सोन्यासारखे चमकाल व आपल्या कणकवली तालुक्याचे नाव रोशन कराल अशी खात्री आहे. अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे ज्यांनी covid-19 च्या महामारीत, आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात शिक्षण विभागाला झुकते माप देऊन, शिक्षण आपल्या दारी या उपक्रमातून महाराष्ट्र राज्याला एक वेगळी दिशा दिलीत.

दिलीप तळेकर माजी सभापती पंचायत समिती कणकवली यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी उपस्थित सुहास पाताडे, शिक्षण विस्ताराधिकारी प्रभाग तळेरे यांच्या कार्याचा गौरव उपस्थित सर्वच मान्यवरांनी केला. एक आदर्श विस्ताराधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुहास पाताडे साहेब आहेत. त्यांच्या कार्याची सर्वांनीच प्रेरणा घ्यावी असे सर्वच उपस्थित मान्यवरांनी गौरउद्गगार काढले. प्रसंगी केंद्रप्रमुख संजय पवार, सद्गुरु कुबल, केंद्रमुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, दशरथ शिंगारे तळेरे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका करंदीकर मॅडम आदी उपस्थित होते.

इयत्ता पाचवी नवोदय वर्गाला मार्गदर्शक म्हणून मालवण तालुक्यातील जि. प . प्राथमिक शाळा कुणकुवळे शाळेतील गेल्या ८ वर्षात १२ विद्यार्थी नवोदय विद्यालयात निवड होण्यासाठी यशस्वी मार्गदर्शन केलेले शिक्षक संजय जाधव, तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख -आमडोस उत्कृष्ट तंत्रस्नेही व शाळेचे पदवीधर शिक्षक विनीत देशपांडे या दोघांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.

विनीत देशपांडे यांच्या सेवा कालावधीत ६ विद्यार्थी नवोदय विद्यालयात निवड झालेले आहेत . या दोन मार्गदर्शकांना उपस्थित राहण्यासाठी विशेष प्रयत्न दशरथ शिंगारे व श्रीराम विभूते यांनी केले . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते. तर आभार संजय पवार केंद्रप्रमुख तथा सराव परिक्षा केंद्र संचालक यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =