You are currently viewing ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पंढरपूर :

 

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी आणि ज्येष्ठ वारकरी संत वैकुंठवासी शाहू महाराज बेलापूरकर यांचे वंशज ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापूरकर (वय 33 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले असून वारकरी संप्रदायासाठी हा मोठा आघात आहे. अतिशय तरुण आणि मनमिळाऊ स्वभावाचे प्रसन्न महाराज यांच्या जिभेवर सरस्वती वास करायची. आपल्या ओघवत्या भाषेत सर्वसामान्यांच्या शब्दात प्रसन्न महाराज कीर्तने करत असल्याने ते वारकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.

प्रसन्न महाराज यांची वर्षात अमळनेर, पैठण, त्र्यंबकेश्वर आणि कार्तिकी यात्रेची आळंदी अशा सहा पायी वाऱ्या असल्याने जवळपास सहा महिने ते पंढरपूरच्या बाहेरच असायचे. आळंदीची पायी वारी करुन बुधवारी (23 नोव्हेंबर) प्रसाद महाराज पंढरपूरमध्ये पोहोचले होते. आज (26 नोव्हेंबर) पहाटे त्यांच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रसन्न महाराज यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या जाण्याने फडपरंपरा तसेच सकल वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे चुलत बंधू आणि बेलापूरकर फडाचे गादी अधिकारी मनोहर महाराज बेलापूरकर यांच्यासह आई, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =